गॅस रिफील करत असताना सिलेंडरचा स्फोट, दोन जण जखमी

पुणे : औंध येथील आंबेडकर वसाहतीमध्ये ओम साई गॅस एजन्सीमध्ये गॅस रिफील करत असताना एका सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी बाराच्या सुमारास घडली. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले असून दुकान मालक फरार झाला आहे.घटनास्थळी औंध अग्निशामक दलाचे जवान पोहोचले असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. येथील धक्कादायक बाब म्हणजे दुकानात 20 मोठे गॅस सिलिंडर व 85 छोटे गॅस सिलेंडर सापडले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गॅस एजन्सीमालक परिसरात छोट्या गॅसची विक्रीही करत होता. त्यामुळे त्याच्याकडे या व्यवसायाचा परवाना आहे का याची पोलीस अधिक चाकशी करत आहेत. तर जखमींना औंध येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.