सभापतीपदीच्या शर्यतीत अनेक दिग्गज रिंगणात असताना राष्ट्रवादीने दिली सामान्य कार्यकर्त्याला संधी

पुणे : राजकारणात फारच कमी वेळा सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळत असते, मात्र शिरुर तालुक्यातील करंदी गावचे शंकर जांभळकर याला अपवाद ठरले आहेत. राष्ट्रवादीचं बहुमत असलेल्या शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली आहे.

चिंताजनक! पुण्यात दिवसभरात ६१७ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १९९ कोरोना बाधित

शंकर जांभळकर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील करंदी ग्रामपंचायतमध्ये लिपीक म्हणून कामाला होते. उच्चशिक्षित शंकर जांभळकर यांचा स्वत:चा व्यवसाय असून सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे म्हणून त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली.

पुण्यात जोरदार पाऊस; तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

गांधीवादी विचारांवर श्रद्धा असलेल्या जांभळकरांनी आपल्या राजकीय वाटचालीसाठी राष्ट्रवादीची निवड केली. याआधी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. आताही सभापतीपदीच्या शर्यतीत अनेक दिग्गज रिंगणात असताना राष्ट्रवादीने या सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे.