पालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्यावर टीका

dhananjay mundhe and pankaja munde 2

परळी : पालकमंत्र्यांच्या विकासाच्या गप्पा म्हणजे केवळ माझ्यावर टीका करणे आहे. स्वतःला कोणतेच काम करता येत नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी आष्टीवरून आणलेलं पार्सल परळीकरांचा अपमान करत होते आणि त्याची मजा बघत होत्या, हेच तर परळीकरांच दुर्दैव आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची खिल्ली उडविली.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात नगर पालिका असल्याने प्रत्येक विकास कामात पालकमंत्री अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात आहेत. मात्र, अशा संघर्षाला मी घाबरत नाही. जनतेच्या आशिर्वादाने आणि रेणुकामातेच्या कृपेने आम्ही हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वी करत आहोत. तसेच आगामी काळातदेखील जनता जनार्दन आमच्या पाठीशी राहील” असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

येथील बसवेश्वर कॉलनीजवळ असलेल्या रेणुका नगरमध्ये धनंजय मुंडेंच्या हस्ते रेणुकामाता मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आमदार विक्रम काळे उपस्थित होते.