नवनिर्वाचीत आमदाराला शुभेच्छा देताना हरभजनकडून झाली ‘ही’ चुक

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारी हा क्रिकेटनंतर आता राजकारणात नवीन खेळी करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर अनेक स्तरातुन त्याचे कौतुक झाले. राजकीय कारकिर्दीत त्याला पहिल्यांदाच मंत्री होण्याची संधी मिळाली आहे.

यावेळी अनेक भारतीय क्रिकेटपटुंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही त्याला ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र या ट्विटमध्ये भज्जीकडून एक चुक झाली. या ट्विटमध्ये हरभजनने लिहीले होते की,’मनोज तिवारी तुझे आभिनंदन मित्रा, तुझ्या कारकीर्दीत जे तुझ्यासोबत झाले ते इतर मुलासोबत नको होऊ देऊ नको, खुप खुप शुभेच्छा’ असे लिहीले. मात्र ही चुक लक्षात आल्यानंतर हरभजनने ते ट्विट हटवले.

मात्र तोपर्यंत या ट्विटचा स्किनशॉट व्हायरल झाला होता. ३६ वर्षीय मनोज तिवारीने शिबपुर येथुन तृणमुल काँग्रेसतर्फे निवडणूक लढवताना ३२००० मतांनी विजय मिळवला होता. मनोज तिवारी याला त्याच्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच मंत्री होण्याची संधी मिळाली. त्याला पश्चिम बंगालच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात क्रीडा व युवा राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP