प्रिया मलिकचे अभिनंदन करताना इशांत आणि विहारीने केली ‘ही’ चुक

मुंबई : रविवारचा दिवस भारतीय क्रिडा जगतासाठी खुपच आनंद देणारा ठरला. ऑलिम्पीक स्पर्धेत भारताने टेबल टेनीस, बॉक्सिंग आणि बॅडमिंटन मध्ये विजय मिळवला. तर जागतीक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने भारताकडून सुवर्णपदकाची कमाई केली. आणि क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

यादरम्यान जगात सगळीकडे ऑलिम्पिक स्पर्धेचा ज्वर चढला आहे. यामुळे प्रिया मलिकने पटकावलेले सुवर्ण पदक हे ऑलिम्पिक स्पर्धेतील आहे असा अनेक जणांचा गैरसमज झाला होता. या गैरसमजाचे शिकार भारतीय संघाचे खेळाडू इशांत शर्मा आणि हनुमा विहारी हे दोघेही ठरले. इंशात शर्मा आणि हनुमा विहारीने प्रिया मलिकला शुभेच्छा देताना तिने ऑलम्पिकमध्ये पटक पटकावले अशा आशयाचे ट्विट केले. मात्र जेव्हा त्यांना चुक लक्षात आली तेव्हा मात्र त्यांनी ट्विट हटवले.

मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. त्याच्या या ट्विटचे अनेक स्क्रिनशॉट सोशल मीडीयावर व्हायरल करण्यात आले. इशांत शर्मा आणि हनुमा विहारी हे दोन्ही खेळाडू सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ पुढील महिन्यात ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे भारतीय वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानुने टोकीयो ऑलिम्पीक स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भारताचे पदकाचे खाते उघडले.

महत्त्वाच्या बातम्या