सिडको फ्री होल्ड करतांना सिटी सर्व्हेला नोंद करावी; एकनाथ शिंदेंकडे मागणी

सिडको फ्री होल्ड करतांना सिटी सर्व्हेला नोंद करावी; एकनाथ शिंदेंकडे मागणी

eknath shinde

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा सिडकोच्या लीज होल्डच्या फ्री होल्डसंबंधी आश्वासन दिले आहे. त्यांची अंमलबजावणी करताना पीआर कार्ड तसेच सिटी सर्व्हेला नोंद करावी, असे साकडे शिवसेना औरंगाबाद पूर्वचे प्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी घातले.

फ्री होल्ड शक्य नसल्यास फ्री होल्ड करतांना नाममात्र दर आकारावा. यात भोगवटा प्रमाणपत्रासाठीचा अतिरिक्त भाडेपट्टा सरसकट रद्द करावा. सिडकोच्या योजनेतील घरावर पहिला मजला बांधण्यासाठी २० ते च ६० हजार ऐवजी दहा हजार घ्यावी. मनपा हद्दीत १०.१ एफएसआय असून सिडकोवरील अतिरिक्त एफएसआयसाठी रेडीरेकनरच्या दरातही शुल्क आकारते.

यासाठी कुठलेही शुल्क न आकारता ना हरकत द्यावी. टपरी व शॉपलेट प्लॉटधारकांना वरच्या मजल्याची परवानगी द्यावी, धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी नाममात्र दर आकारावा, निवासी भूखंडातील व्यावसायिक वापराएवढेच शुल्क आकारावे, कोरोनाच्या दोन वर्षांतील अतिरिक्त भाडेपट्टा वसुलीतून सूट द्यावी, नोटरीवरील घरांसाठी मुंबई व नांदेडप्रमाणे हस्तांतरणाची कारवाईची मागणी स्वामी यांनी निवेदनातून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या