ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे ; तावडेंचा ठाकरेंना टोला

टीम महाराष्ट्र देशा : सीबीएसई पेपरफुटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत फेरपरीक्षा देऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले होते. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारल असता, ज्या पक्षाचा एकही आमदार नाही, त्यांच्या भूमिकेवर काय बोलायचे, असा टोला विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

खासगी क्लासेसमुळे, शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे सीबीएसईचे पेपर फुटले. सोशल मीडियामुळे हे प्रकार वाढत आहेत. त्याला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेले धोरण केंद्र सरकारला पाठविले जाईल. ते केंद्र सरकार स्वीकारेल, अशी अपेक्षा तावडेंनी व्यक्त केली आहे.