अनगरच्या शिवाजी चौकात ५० वर्षात कोणत्या विरोधकांनी सभा घेतली नाही- बाळराजे

टीम महाराष्ट्र देशा – अनगरच्या शिवाजी चौकात गेली ५० वर्षे कोणत्या विरोधकांनी सभा घेतली नाही. ती तुम्ही राजन पाटील यांच्या सहकार्याने घेऊन दाखवली आहे. तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असूनही पक्षभेद न करता खासदार बनसोडे यांनी सर्व ग्रामपंचायतींना निधी दिला. विरोधकांनाही कसे जवळ करून आपलेसे करावे, हे खासदार बनसोडे यांच्याकडून शिकावे, असे म्हणत बाळराजे पाटील यांनी बनसोडे यांचे कौतुक केले.

अर्जुनसोंड येथे खासदार निधीतून साडेसात लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे कुदळ मारून खा. बनसोडे यांनी भूमिपूजन केले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील होते.

भाजपचे खासदार शरद बनसोडे व राष्ट्रवादीचे बाळराजे पाटील हे अलीकडच्या काळात अनेकदा एकत्र आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार म्हणून निश्चित मानले जात आहेत. अशावेळी पाटील यांनी भाजपच्या खासदारांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याप्रसंगी भाजपचे प्रांतिक सदस्य शंकरराव वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, सज्जन पाटील, युवक अध्यक्ष राहुल मोरे, धनाजी गावडे, संतोष नामदे, मुकुं द ढेरे, सरपंच शुक्राचार्य हावळे, हनुमंत भोसले, अमोल पाटील उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...