शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय – उदय सामंत

uday samant

सांगली – शाळा सुरू करायच्या किंवा नाही हा ऐच्छिक विषय असून याबाबत कोणतीही सक्ती करण्यात आली नाही, मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबर पर्यंत सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यात सुद्धा तेथील प्रशासन आणि पालकांच्या मतांच्या निर्णयानुसार शाळा सुरू करायच्या अथवा न करायच्या याबाबत निर्णय घेण्यात येतील मात्र शाळा सुरू करण्याचे निर्णय निश्चित स्वरूपाचे आहेत अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सांगली मध्ये महाविकास आघाडीच्या पदवीधर निवडणुक उमेदवारांच्या प्रचार सभेदरम्यान सामंत बोलत होते. कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन असतानाच, त्या विषयी आंदोलन करून भाजप श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्राध्यापक भरतीची स्थगिती ही फक्त कोरोना काळापूर्ती होती, मात्र त्या विषयी अपप्रचार सुरू आहे, आचारसंहिता संपल्यावर प्राध्यापक भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना उद्यापासून राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घ्यावा असं शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितल्यानंतर मुंबई महानगरपालीकेनं लगेचच डिसेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू करायच्या नाहीत असा निर्णय घेतला. राज्यात काही ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, काही ठिकाणी शाळेची घंटा इतक्यात नको असं ठरतंय पण काही ठिकाणी प्रशासन सरळ संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर निर्णयाची जबाबदारी टाकून मोकळं झालं आहे.

दरम्यान,  पुणे जिल्ह्यात किती पालक हमीपत्र देतात त्यावर मुख्याध्यापक निर्णय घेणार आहेत. पुणे महापालिकेनं 13 डिसेंबरपर्यंत तरी शाळा सुरू करायच्या नाहीत असं ठरवलं आहे. नागपूरनंही शाळांची घंटा 13 डिसेंबर पर्यंत वाजवायची नाही असं ठरवलं असून औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या सर्व शासकीय आणि खाजगी शाळा तीन जानेवारी पर्यंत बंद राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या