गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट कायम

जाकिया जाफरी यांची याचिका हाईकोर्ट ने फेटाळली

वेब टीम :२००२ मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी एस आय टी आणि अन्य तपास यंत्रणांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जी क्लीन चीट दिली होती ती हायकोर्टाने देखील कायम ठेवली आहे . तसेच गुजरात दंगलींचा नव्याने तपास करण्यासही स्पष्ट शब्दात हायकोर्टाने नकार दिला आहे .

गुजरात मध्ये २००२ साली गोध्रा हत्याकांडा नंतर मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये अनेक निरपराध लोकांचा बळी गेला होता .तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना जबाबदार असल्याचा सातत्याने आरोप केला जात होता मात्र एस आय टी आणि अन्य तपास यंत्रणांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिली होती,याविरोधात दिवंगत खासदार अहसान जाफरी यांची पत्नी जकिया आणि सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सीतलवाड़ यांची एनजीओ ‘सिटीजन फार जस्टिस एंड पीस’ यांनी गुजरात दंगली म्हणजे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप करत या प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती जी मागणी न्यायमूर्ति सोनिया गोकानी यांनी फेटाळून लावली आहे तसेच नरेंद्र मोदी यांना जी क्लीन चीट दिली होती ती हायकोर्टाने देखील कायम ठेवली आहे.