‘खून, रेप, ड्रग्स असो वा लफडेबाजाचा विषय, पेंग्विन त्यामध्ये असणारच!’

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राने केलेल्या अश्लील चित्रीकरण निर्मितीचे प्रकरण चर्चेत आहे. चित्रपट सृष्टी बरोबरच राज कुंद्रा प्रकरण राजकीय स्तरावर पण गाजत असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय नेत्यांची प्रतिकिया देखील यावर येत आहे. या प्रकरणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी या प्रकरणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना धारेवर धरले आहे. त्यांनी सरळ आदित्य ठाकरे यांना बॉलीवूडचा भाड्यावर घेतलेला पेंग्विन अशा शब्दात टीका केली आहे. या सरकारने लाज सोडली असे देखील ते म्हणाले. बॉलीवूडमधील खून प्रकरण असो, बलात्कार प्रकरण असो की इतर लफडी त्यात आदित्य ठाकरे यांचा हात असतोच असा आरोप राणे यांनी केलाय.

राणेंनी सोशल मीडियावरील आदित्य ठाकरे यांनी केलेली एक जुनी पोस्ट शेअर करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. त्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे राज कुंद्रा यांना टॅग करून म्हणतात की, ‘तुमच्याशी झालेली भेट आनंदाची होती, पुन्हा लवकरच भेटू’. ही पोस्ट आदित्य ठाकरे यांनी २४ नोव्हेंबर २०१५ ला केली होती त्यावेळी आदित्य ठाकरे युवसेना प्रमुख होते. यावरून राणे यांनी असा सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे की आदित्य यांचे कुंद्रा यांच्यासोबत त्यांचे जुने संबंध होते.

दरम्यान, कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला काल सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP