‘सत्तेत असो वा विरोधी बाकांवर, हा विषाणू भेदभाव करत नाही’

corona

कर्नाटक : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. कर्नाटकातही कोरोनामुळे स्थिती चिंताजनक आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे आता केवळ देवच आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो, असे उद्गार कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. स्त्रीरामुलू यांनी काढले.

कर्नाटकातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भाष्य करताना ते म्हणाले, ‘जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सगळ्यांनी सर्तकता बाळगायला हवी. तुम्ही सत्तेत असाल वा विरोधी बाकांवर. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, हा विषाणू असा कोणताही भेदभाव करत नाही. मला शंभर टक्के खात्री आहे की, पुढील दोन महिन्यात रुग्णांची संख्या वाढेल’.

सरकारच्या कामाविषयी बोलताना ते म्हणाले, ‘सध्या असे दावे केले जात आहेत की, सरकारचे दुर्लक्ष होत आहे किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे वा मंत्र्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. पण या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. सत्य माहितीपासून हे दूर आहेत. आता केवळ देवच आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो,” असं स्त्रीरामुलू म्हणाले .

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं बंगळुरूमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला असून, बुधवारी कर्नाटकमध्ये ३००० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ही कर्नाटकातील दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची उच्चांकी वाढ आहे. सध्या कर्नाटकातील एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार २५३ इतकी आहे. यापैकी १८ हजार ४६६ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बेड, व्हेंटिलेटरची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करावी; नगरसेविकेची मागणी

पुण्यात लॉकडाऊन का ? अजित पवारांचा मोठा खुलासा

धारावी परिस्थिती हाताळण्यामागे राहुल गांधींचे मार्गदर्शन; मंत्री वर्षा गायकवाडांची श्रेयवादात उडी