मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा विस्फोट होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आजचा दिवसच शिल्लक उरला आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघितले जात आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यातच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आजच सिद्धीविनायकाचे दर्शन घेत महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम हातात यावं, असं साकडं सिद्धिविनायकाला घातलं. तर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लंडनमध्ये हिंदू मंदिरात विशेष पूजा केली आहे. त्यामुळे फडणवीस लवकरच मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेणार का? अशा चर्चा आता रंगत आहेत.
अमृता फडणवीस यांची पोस्ट-
“नमस्ते लंडन ! लंडनला उतरलो आणि हिंदू मंदिराला भेट दिली. परदेशी भूमीतील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि विशेष पूजा केली. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये; लोक आधी, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट”, अशी पोस्ट अमृता फडणवीस यांनी केली आहे.
तर गोपीचंद पडळकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाताहत झाली. बहुजन समाज, सामान्य जनता, व्यापारी, शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले. राज्यावरचं हे संकट टळो. महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम हातात यावं. असं साकडं सिद्धिविनायकाला घातलं. बोला गणपती बाप्पा मोरया…”
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाताहत झाली.बहुजन समाज,सामान्य जनता,व्यापारी,शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले.राज्यावरचं हे संकट टळो,महाराष्ट्राचं नेतृत्व मा.@Dev_Fadnavis साहेबांच्या सक्षम हातात यावं.असं साकडं सिद्धिविनायकाला घातलं.
बोला गणपती बाप्पा मोरया… pic.twitter.com/fjpnjDiMe3— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 29, 2022
बहुमताच्या निर्णयावर शिवसेनेची कोर्टात धाव-
शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान “आम्ही उद्या मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे ५० आमदार आहेत. दोनतृतियांशपेक्षा जास्त बहुमत आमच्या शिवसेना गटाकडे आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणीत आम्ही पास होणार आहोत. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी देखील आम्ही जाणार आहे. लोकशाहीत संख्या महत्त्वाची असते. या देशात राज्यघटना आणि कायद्याच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही.” असा इशारा आज एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे सांभाळावी अशा इच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Wimbledon : दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स पहिल्याच फेरीत गारद; पाहा VIDEO!
- Eknath Shinde : “आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार”, एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य
- Gajanan Kale : “ठाकरे पिता-पुत्रांनी आमदारांना बैलगाडीतून आणावं…” ; गजानन काळेंचे ट्वीट
- “…हे बाप लेकाला कळलेच नाही” ; सदाभाऊंचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल
- केएल राहुलवर जर्मनीत शस्त्रक्रिया! लखनऊ सुपर जायंट्सनं शेअर केली पोस्ट
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<