VIDEO- मग कुठे आणि नक्की कुणाचे अच्छे दिन? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा-  आज एक टक्का जनतेकडे देशातील ७३ टक्के संपत्ती एकवटली आहे, जी पूर्वी ४९ टक्के होती आणि ९९ टक्के जनतेकडे २७ टक्के संपत्ती आहे जी पूर्वी ५१ टक्के होती. मग कुठे आणि नक्की कुणाचे अच्छे दिन? अशी टीका अजित पवार यांनी हल्लबोल आंदोलनात परभणी येथे केली.

अजित पवार यांनी चंद्रकांत दादा यांचाहि समाचार घेतला ते म्हणाले परभणी ते गंगाखेड हा रस्ता इतका भारी आहे की त्या रस्त्याचे “मोदी बुलेट रस्ता” असे नामकरण करायचे असल्याची मागणी जिल्ह्यातील जनतेने केली आहे. म्हणूनच चंद्रकांतदादा पाटील परभणीत येऊन १० मिनिटात कुणालाही न भेटता निघून गेले.