पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय?- माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर

modi-lokur

नवी-दिल्ली : माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात बोलतांना सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी ‘पीएम केअर फंडातील पैशांचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. पण वास्तवात तस झाले का?’ असे म्हणत माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केले जात असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’उदाहरण म्हणून आपला पीएम केअर फंडचं घेऊयात. यामध्येही करोडो रुपये आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण फंडात किती पैसा आहे हे आपल्याला माहिती नाही. तो कसा खर्च करण्यात आला आपल्याला माहिती नाही. याचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण वास्तवात तसं झालं का? आपल्याला माहिती नाही’ असे लोकूर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘जर तुम्ही पीएम केअर वेबसाईटवर गेलात तर तिथे २८ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० दरम्यानचा ऑडिट रिपोर्ट आहे. यामध्ये चार दिवसात ३००० कोटी जमा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही आकडेवारी पाहिलीत तर आपण हजारो कोटींबद्दल बोलत आहोत. पण हा पैसा कुठे जात आहे? आपल्याला माहिती नाही.’ तसेच २०२०-२१ मधील ऑडिट रिपोर्ट अद्याप तयार करण्यात आलेला नाही. एक वर्ष झालं आहे. आज १२ ऑक्टोबर आहे, पण ऑडिट रिपोर्टबद्दल कोणाला माहिती नाही, असा प्रश्नी यावेळी लोकूर यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या