मी भाजपा सोडते आहे या वावड्या कुठून आल्या : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या फेसबुक पोस्ट वरून चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या या पोस्ट वरून त्या पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोस्टमध्ये त्यांनी १२ डिसेंबर रोजी महत्त्वाची घोषणा करण्याचा इशारा देखील दिला आहे. उद्या 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यामुळे त्या उद्या काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गोपीनाथ गडावर उद्या होणात्या मेलाव्य्यच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ” मी भाजपा सोडते आहे या वावड्या कुठून आल्या? असा प्रश्न भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. मी नाराज नाही असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इथं सगळे एकत्र काम केलेले लोक आहोत. त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? असाही प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. कारण नसताना या सगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमाची गोपीनाथ गडावर जय्यत तयारी सुरु आहे. ‘आजपर्यंत थांबला आहात तर आता अजून एक दिवस थांबून वा़ट पाहा, सर्व काही लवकरच समजेल. असा सूचक विधान केल आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी उद्या संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची गोपीनाथ गडावर जय्यत तयारी सुरु आहे.

भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 12 डिसेंबर अर्थात उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियावर मोहीम सुरु केली आहे. यामुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या :