६० वर्ष सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला ?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री, अजित पवारांना सवाल

पुणे : पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप विजेत्या गावांना आज गौरवण्यात आल. पुण्यातील बालेवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, महाराष्ट्राला स्वतंत्र होवून ६० वर्ष झाली. मात्र, आजवर सिंचनावर खर्च केलेला पैसा कुठे गेला असा सवाल केला आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

Loading...

संयुक्त महाराष्ट्र होवून आज ६० वर्ष झाली आहेत. आधीच्या सरकारमधील आणि आजच्या सरकारचे नेते इथे आहेत. एवढे वर्ष जलसंधारणावर खर्च करण्यात आलेला पैसा कुठे गेला, याच कोणीतरी उत्तर द्याव. महाराष्ट्रातल्या जनतेला जागृत करण्याच काम अमीर खान करत असेल तर सरकार नेमकं करत तरी काय, असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी यावेळी केला.

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सातारा जिल्हातील मान तालुक्यात असणाऱ्या टाकेवाडी आंधळी या गावाला पहिला क्रमांक मिळाला आहे, तर सातारा जिल्हातीलच भांडवली आणि बुलढाणा जिल्हातील सिंदखेड या गावांना संयुक्तपणे दुसरा क्रमांक मिळाला आहे.

‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...