‘नागरिकांच्या खिशातून हिसकावलेला पैसा कुठे गेला?,’ राहुल गांधींचे टीकास्त्र

rahul gandhi

नवी-दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारची तुलना पुरातन लोककथांमधील भरमसाठ करवसुली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी केली आहे.

यासंदर्भात राहुल यांनी ट्विट केले आहे. ज्यात ते म्हटले आहे की,’पुरातन लोककथांमध्ये भरमसाठ करवसुली करणाऱ्या स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या गोष्टी होत्या. अशावेळी सुरुवातीला जनता दुखी होते, मात्र नंतर शेवटी हीच जनता हे सरकार संपवते. वास्तवातही असंच होणार.’ तसेच या ट्विटमध्ये त्यांनी करखंडणी आणि इंधन दर हे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत.

दरम्यान, राहुल यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. यामध्ये ‘सरकारने २३ लाख कोटी रुपये जीडीपीतून कमावले आहेत. हा जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नाही, तर गॅस, डिझेल, पेट्रोल आहे. हे २३ लाख कोटी रुपये गेले कुठ हा माझा प्रश्न आहे. नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जात आहे हा पैसा कुठं जातोय हा जनतेनं प्रश्न विचारायला हवा’ असे म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या