“शिवसैनिक कुठे आहेत त्यांनी पुढे यावं”, भोकरमध्ये अशोक चव्हाणांनी घडवले आघाडीच्या एकीचे दर्शन

नांदेड : जिल्ह्यात आघाडीमध्ये फूट पडल्याचे काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. शिवसेनेतून भाजपमध्ये गेले सुभाष साबणे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांवर आरोप केले होते. त्यामुळे शिवसैनिक आणि काँग्रेसमध्ये प्रचंड कलह असल्याची चर्चा होती. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी शिवसैनिक आणि काँग्रेसमध्ये समेट घडवून आणला आहे. भोकरमध्ये एका उद्घाटन कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी शिवसैनिकांना उद्घाटनाचा मान देत महाविकासआघाडी स्थानिक पातळीवर देखील मजबूत असल्याचं कृतीतून दाखवून दिलं आहे.

पाळज येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे शनिवारी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, सुभाष नाईक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रात आपली महाविकास आघाडी आहे. मग शिव सैनिकांनी मागे राहू नये, असं आवाहन केलं. मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला.

नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघात एका कार्यक्रमात महाविकासआघाडी स्थानिक पातळीवर देखील मजबूत करायची असल्याचं कृतीतून दाखवून दिलंय. भोकर मतदारसंघातील विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी अशोक चव्हाणांनी मोठ्या मनानं शिवसैनिकांना साद घातली. शिवसैनिकांनी देखील अशोक चव्हाणांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अखेर त्या विकासकामाचं भूमिपूजन शिवसैनिकांच्या हस्ते करण्यात आलं. महाविकास आघाडी आता स्थानिक पातळीवर मजबूत होत असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं.

भोकर मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसैनिकांना जय महाराष्ट्र करत साद दिली. नगर पंचायत निवडणूक निकलानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यामध्ये काही जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी मजबूत असल्याचं कृतीतून दाखवून दिलं आहे. शिवसैनिकांनी देखील मंत्री चव्हाण यांच्या शब्दाला मान देत पुढं येऊन विकासकामांचे नारळ फोडले.

महत्वाच्या बातम्या