‘षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात?’

ameya khopkar

मुंबई: यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.दरम्यान यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

षण्मुखानंद सभागृहात दसरा मेळावा साजरा करताना सरकारचे निर्बंध कुठे लपून बसतात? शिवसैनिक ५० टक्के आसनक्षमतेने गर्दी करतील, यावर आम्ही विश्वास ठेवायचा? दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली यांना चालत नाही, नाटकाची परंपरा इतके दिवस खंडित झाल्याचं यांना सोयरसुतकही नाही? असा संतप्त सवाल अमेय खोपकर यांनी केला आहे.

तसेच राज्य सरकारला इतकंच होतं तर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाट्यगृहं का खुली केली नाहीत? नाट्यकर्मी आणि प्रेक्षक यांचा मेळावा राजकीय अजेंड्यापेक्षा मोठा आहे हे यांना लक्षातच येत नाही का? असा सवालही यावेळी अमेय खोपकर यांनी ट्वीट करत केला आहे.

महत्वाच्या बातम्या