त्यांचे बुरे दिन आले कि ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतात: पी चिदंबरम

p chidambaram on surgical strike

काल भारत-म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराने नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (खापलांग) संघटनेच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत अनेक आतंकवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र आता यावरूनच माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवरच निशाना साधला आहे. सरकार आपले ‘बुरे दिन’ आले कि सर्जिकल स्ट्राईक करते अशी टीका चिदंबरम यांनी केली. तसेच अशा प्रकारच्या अनेक कारवाया यापूर्वीही झाल्या असल्याच म्हटल आहे.

सीमेवर नेहमीच लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी होत असतात, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी असो कि सुशीलकुमार शिंदे कोणाला हि विचारल तर या आधी अशा कारवाया झाल्या आहेत, हेच सांगतील मात्र भाजप सरकारचे वाईट दिवस आले की ते सर्जिकल स्ट्राईक’ करतात, अशी खरमरीत टीका चिदंबरम यांनी केली. सध्या देशात सुरु असणारी प्रत्येक गोष्ट सर्जिकल स्ट्राईकच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.