म्हणून मला ‘ए’ ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले-जरीन खान

सलमानसोबत ‘वीर’मध्ये काम केल्यानंतरही जरीनला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला. याचे एकमेव कारण म्हणजे तिचे वाढलेले वजन होते. वाढलेल्या वजनाचे कारण देऊन कोणीही तिला कोणीही चित्रपटात संधी देण्यास तयार नव्हते.

सलमान खानसोबत तिला ड्रीम डेब्यू करण्याची संधी नक्की मिळाली, मात्र त्यानंतर तिला संघर्ष करावा लागला हेही तेवढेच खरे आहे. झरीनने एका मुलाखतीत असे सांगितले मला असे म्हटले जायचे की, तू इंडस्ट्रीत एका यशस्वी अभिनेत्रीप्रमाणे (कॅटरिना कैफ) दिसतेस. परंतु तिच्या तुलनेत तुझे वजन खूपच आहे.

जरीनच्या मते, एक काळ असा होता की, माझे वजन एखाद्या राष्ट्रीय मुद्द्याप्रमाणे चर्चिले जात होते. विशेष म्हणजे इतर अभिनेत्रींना त्यांच्या वजनावरून कधीच कामापासून दूर ठेवले जात नव्हते; परंतु माझ्याबाबतीत सगळे उलटे घडत होते. मी कशी दिसते?, मी कसे कपडे परिधान करते? यावरून माझ्यावर चहुबाजूने टीका केली जात होती.

Loading...

त्यामुळे मला घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. माझ्या इच्छा नसतानाही मला केवळ वाढलेल्या वजनामुळे ‘ए’ ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले.

Loading...

Loading...

 

जरीन खान लवकरच प्रेक्षकांना हॉट अंदाजात बघावयास मिळणार आहे. ‘हेट स्टोरी-३’मध्ये जरबदस्त बोल्ड सीन्स देणारी जरीन आता २००६ मध्ये आलेल्या इमरान हाशमी आणि उदिता गोस्वामी स्टारर ‘अक्सर’ या चित्रपटाच्या सीक्वल ‘अक्सर-२’मध्ये झळकणार आहे

1 Comment

Click here to post a comment