नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेला पोहोचल्यानंतर अद्याप मीडियाशी का संवाद साधला नाही, याचा खुलासा केला आहे.
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार कोहलीने पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केले. मात्र, त्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधलेला नाही याबाबतच राहुल द्रविडने मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्याने अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली होती. त्याचवेळी विराट कोहलीनेही त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी कोहली पत्रकार परिषदे का सामील होत नाही हे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “असा कोणताही मुद्दा नाही. तो केपटाऊनमध्ये 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. त्या सामान्यानंतर तो माध्यमांच्या समोर येईल.”
भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकला असून सोमवारपासून जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकू शकते.
महत्वाच्या बातम्या
- “१० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाला…”,अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत
- ठाण्यात मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबीरास प्रारंभ
- लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला- प्रविण दरेकर
- अभिनेता जॉन अब्राहमसह पत्नी प्रिया कोरोना पॉझिटिव्ह
- योगी सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड; मोदींकडून कौतुक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<