पुणे : महागाई दरात सातत्याने वाढ होत आहे. एप्रिलमध्ये महागाई दर ७.७९ इतका झाला असून मार्चमधील महागाई दराच्या तुलनेत एप्रिलमध्ये एका महिन्यातच एका टक्क्याने वाढ झाली आहे. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे यांनी महागाईवरून अच्छे दिन कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. “महागाईवरून २०१४ ला आगीचा डोंब उठवला होता. तीच महागाई आटोक्यात आणणार म्हणून लोकांनी भाजपाला सत्तेत आणले आणि आज महागाई दर ७.७९ इतका झाला.” असा सणसणीत टोला रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला लगावला आहे.
एप्रिमध्ये महागाई दर ६.९५ वरुन ७.७९ वर पोहोचला असून एका महिन्याच्या कालावधीच १ टक्काने वाढ झाली आहे. दरम्यान एप्रिल २०२१ मध्ये महागाई दर फक्त ४.२३ टक्के इतका होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये महागाई दरात तब्बल ५.५६ टक्क्यानी वाढ झाली आहे. याच महागाईच्या मुद्द्यावर रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करत, अच्छे दिन कुठे आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
महागाईवरून 2014 ला आगीचा डोंब उठवला होता.तीच महागाई आटोक्यात आणणार म्हणून लोकांनी भाजपला सत्तेत आणले
आज जनतेची होरपळ ,निर्देशांक 7.79 झाला.
महागाईचा दर ग्रामीण 7.66 वरून 8.38
शहरीभाग 6.12 वरून 7.09 झाला
कुठयत अच्छे दिन,कधी येणार अच्छे दिन@narendramodi @maha_governor— Rupalipatilthombare (@Rupalispeak) May 13, 2022
आपल्या ट्वीटमध्ये रुपाली ठोंबरे यांनी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महागाई दराची तुलना केली आहे. ग्रामीण भागात महागाई दर ७.६६ वरून ८.३८ वर पोहोचला आहे तसेच शहरी भागात महागाई दर ६.१२ वरून ७.०९ झाला आहे. तर मग अच्छे दिन कुठे आहेत? कधी येणार अच्छे दिन? असा सवाल करत त्यांनी भाजप आणि मोदीसरला लक्ष्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :