सलमान खान त्याच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत काम कधी करणार?, मॉडलेचा सवाल

सलमान

मुंबई : ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने केआरकेच्या विरोधात मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला आहे. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर आता सोफियाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. तिने देखील सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच काय तर पोस्टमध्ये सोफीयाने सलमान खान त्याच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत काम कधी करणार? असा सवाल केला आहे.

सोफियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानसाठी पोस्ट लिहिली आहे. ‘पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सलमानने जुन्या ट्रिकचा वापर केला आहे. त्याने पुन्हा ईदच्या दिवशीच चित्रपट प्रदर्शित केला. त्याने तिच बोरिंग कथा आणि लूकचा वापर चित्रपटात केला आहे’ असे सोफियाने म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली की, ‘राधे’ चित्रपट पाहून नवीन काहीच पाहायला मिळाले नाही राधे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला जाणावले की मी आधीदेखील असे सीन्स पाहिले होते. सलमान नेहमी त्याच्या चित्रपटात तरुण अभिनेत्रींसोबत काम करताना दिसतो. तू तुझ्या वयाच्या अभिनेत्रीसोबत कधी काम करणार? आता त्याचा चाहता वर्ग त्याच्या नेहमीच्या कंटाळवाणी कथा पाहायला मिळतात,’ असे सोफिया या पोस्ट मध्ये म्हणाली आहे.

तर, अभिनेता रणदीप हुड्डा विषयी बाबत ही ती म्हणाली, ‘चित्रपटात रणदीप हुड्डाला पाहून वाईट वाटले. तो एक उत्तम अभिनेता आहे. पण या चित्रपटातील त्याचा रोल हा फारसा कोणाला आवडला नाही. त्याने ही भूमिका करण्यास होकार दिला कारण हा सलमान खानचा चित्रपट होता? ही संपूर्ण इंडस्ट्रीची समस्या आहे. चित्रपटातील रणदीपचे पात्र योग्य पद्धतीने लिहिले गेलेले नाही असे जर तो बोलला तर त्याला इंडस्ट्रीमधून बाहेर काढले असते?’, असेही ती म्हणाल्या ने सलमानच्या चात्यांनी मात्र यावर
नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP