‘वीर सावरकरांना भारतरत्न कधी देणार ते सांगा ?’, राऊतांचा भाजप व मोहन भागवत यांना सवाल

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती. असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. ते ‘वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन’ या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे.या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोहन भागवत यांनी म्हटले की, ‘सावरकर कठोरपणे बोलले म्हणून जनतेचा गैरसमज झाला. पण जर संपूर्ण भारत त्यांच्यासारखे बोलला असता तर देशाला फाळणीला सामोरे जावे लागले नसते.’ असे वक्तव्य भागवत यांनी केले आहे.

यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘मोहन भागवतांनी नवीन काय सांगितलं? बाळसााहेब ठाकरेंनी वारंवार हेच सांगितलं आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचारच बाळासाहेबांचा आहे, असं सांगतानाच संघाने आता कोणत्या भूमिका घ्याव्यात आणि कधी घ्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका कायम तीच राहिली आहे. वीर सावरकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील. म्हणून आजही सांगतो मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपला सावरकरांविषयी प्रेम आलंय तर त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यांना भारतरत्न केव्हा देणार एवढेच विचारतो असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

यावेळी राऊतांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिदाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन खोचक टोला लगावला आहे. ‘अजुनी यौवनात मी, असं अनेकांना वाटतं. हे नाटक रंगमंचावर फार गाजलं. तसं अनेकांना वाटतं की अजुनी यौवनात मी. मी अजूनही मुख्यमंत्री… आम्हालाही दिल्लीत गेल्यावर कधी कधी वाटतं आमचा पंतप्रधान होणार’, असा टोला राऊत लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या