पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरणामुळे देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जात आहेत.
तर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या खासदार-आमदारांचा वय हे ५० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना लस देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. यामध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लस दिली जाईल असे समजते. दरम्यान, काल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना लस कधी घेणार असा प्रश्न पत्रकारांतर्फे करण्यात आला.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस अशा व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील, की यांनीही लस घेतली पाहिजे, आम्ही लगेच लस घेऊन तुम्हाला सांगेन मी लस घेतली.’
दुसरीकडं, या लशींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला लस घ्यावी असं आव्हान दिलं होतं. दरम्यान, या लसी सुरक्षित असल्याचं तज्ञांसह पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- काँग्रेसकडून प्रियांकांची ‘इमेज बिल्डिंग’; तब्बल १० लाख कॅलेंडरचे वाटप !
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला