fbpx

कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार : वडेट्टीवार

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पीक विम्यासंबंधी शिवसेनेवर टीका करताना कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार अशा आशयाचं विधान केले आहे.

चिमूर येथील शेतकरी भवन येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ‘सत्तेत राहून मलीदा खायचा आणी शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायचे असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पीक विमा कर्जाचा लाभ मिळालाच नाही. कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पुढे बोलताना राज्याचे मुख्यमंत्री राज्यात भाजप सेनेचे २१० जागा निवडून येणार आहेत असे म्हणतात. फडणविसांनी काय भविष्य किंवा कुंडली पाहिली काय ? इव्हिएम मशीन सेट करून केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तेवर येणार? असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी तिवरे धरण हे खेकडयांनी पोखरल्याने फुटला असे वक्तव्य मंत्र्यांनी केले. मात्र हे धरण खऱ्या खेकड्यांनी फोडले नसून माल खाणाऱ्या खेकडयांनी फोडले आहे, अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.