#व्यक्तिविशेष : सावरकरांना भारतरत्न कधी ?

savarkar

कौशल मुकूंदराव खडकीकर : सुर्याची प्रखरता, वार्याचा वेग, खडकालाही हेवा वाटावा अशी कठोरता, साक्षात बृहस्पतींनी शिष्यत्व पत्करावं अशी प्रगल्भता, आणि या सर्वांनी धारण केलेला मानवी अवतार म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या सर्वस्वाची आहुती देऊन ज्यांनी या भारतमातेच्या मुक्ततेसाठी आयुष्यभर संघर्ष केला ते म्हणजे क्रांतीकारकांचे मुकुटमनी, थोर भारतीय नेते, समाजसुधारक, महाकवी, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर.

सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुर या गावी झाला.लहानपणीच अवघ्या 9 वर्षाचे असतांना त्यांना मातृवियोगाचे दुःख सहन करावे लागले.ते 7 वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.त्यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेशराव सावरकर यांनी घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. लहाणपणपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाचा व कार्याचा सावरकरांवर खुप मोठा प्रभाव होता. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी अष्टभुजादेवीसमोर आपल्या मातृभुमीच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देईल, अशी शपथ घेतली. मित्रमेळा या संघटनेची स्थापन करून त्यांनी आपल्या राष्ट्रकार्याला सुरूवात केली. सन 1901 मध्ये विनायकराव सावरकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर रामचंद्रराव चिपळुणकर यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

स्वा. सावरकर यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात खडाजंगी

पुढील शिक्षणासाठी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला आल्यावर त्यांनी अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली. सन 1905 मध्ये बंगाल फाळणीनंतर लोकमान्य टिळकांनी सर्व जनतेला विदेशी मालावर आणि कपड्यांवर बहिष्कार घालण्यााचं आवाहन केले. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुढाकार घेऊन दिनांक 7 ऑक्टोंबर 1905 रोजी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली. या गोष्टीने ब्रिटीश राज्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असतांना सावरकरांनी अनेक युवकांना आपल्या प्रभावी वक्तृत्वाने एकत्रीत करून क्रांतीकार्यासाठी अभिनव भारतामध्ये सामावून घेतले.

त्यावेळी अनेक लोक उच्च शिक्षणासाठी, व्यापारासाठी किंवा पैसे कमविण्यासाठी लंडनला जात असत, परंतू ब्रिटीश सरकारचा कारभार समजून घेऊन त्यातील बारकावे तपासण्यासाठी व त्यांचा उपयोग पुन्हा भारतात येऊन ब्रिटीश सत्तेला हद्दपार करण्यासाठी म्हणून 1906 मध्ये सावरकर श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शिष्यवृत्तीवर लंडनला पुढील शिक्षणासाठी गेले. लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांनी इंडिया हाऊस मधून आपले क्रांतीकार्य चालू ठेवले. जुन 1908 मध्ये “1857 चे स्वातंत्र्यसमर’ हा भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचे वर्णन करणारा महाग्रंथ त्यांनी लिहिला. हॉलंडमधून या ग्रंथाची छपाई करून नंतर त्याच्या प्रति भारतात वाटण्यात आल्या.

पुढे मदनलाल धिंग्रा या सावरकरांच्या सहकार्याने कर्झन वाईली या ब्रिटीश अधिकार्याची हत्या केली. त्यानंतर ब्रिटीश सरकारने सावरकरांना क्रांतीकारी चळवळीत सहभागी असल्यावरून अटक केली. परंतु जुलै 1908 रोजी एस.एस.मोरिया नाम जहाजातून भारताकडे नेत असतांना मॉर्सिलीस बंदरातून त्यांनी त्रिखंडात गाजलेली ती उडी मारली. परंतु किनार्यावर घेण्यास येणार्या सहकार्यांना पोहचण्यास उशीर झाल्यामुळे सावरकर पुन्हा एकदा पकडले गेले. त्यानंतर त्यांना ब्रिटीश सरकारने दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशी शिक्षा झालेले सावरकर जगातील एकमेव क्रांतीकारक होते. यावरून ब्रिटीश सरकारच्या मनात सावरकरबद्दल असलेली भिती स्पष्टपणे दिसुन येते.

त्यांना भारतात आणून अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये कैद करण्यात आले. तिथे क्रांतीकारी कैद्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात असत. बैलाला जुंपतात, त्याप्रमाणे कैद्याला जुंपुन 12-14 तास त्यांच्याकडून तेल काढण्यासाठी काम करून घेतलं जात असे. कामात कसुर झाल्यावर बेताचे फटके सहन करावे लागत असे. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मनात असलेली स्वातंत्र्याची ज्योत सावरकरांनी कधीच विझू दिली नाही. जेलमधील स्वातंत्र्य संग्रामातील कैद्यांना एकत्रित करून ते त्यांचे प्रबोधन करत असत.

बॅंका राज्य सरकारचे ऐकून शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज देतील का?

अशा प्रतिकुल वातावरणातदेखील त्यांनी काट्या-कुट्यांच्या सहाय्याने भिंतीवर लिहून आपले लिखान चालू ठेवले. अत्यंत उच्च कोटीच्या कविता सावरकरांनी अंदमानच्या भिंतीवर रेखाटलेल्या आहेत. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाकवी म्हणून संबोधले जाते.

9सन 1921 रोजी त्यांना अंदमानहून रत्नागिरीला आणण्यात आले व स्थानबद्ध करण्यात आले. तेंव्हा सावरकरांनी सामाजिक सुधारणेची चळवळ हाती घेतली. अस्पृश्यता, जातीभेद, यावर त्यांनी हिंदु समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी रत्नागिरीतील पतीत पावन मंदिर दलितांसाठी खुले केले.

हिंदु समाजात असलेले जातीभेदाचे प्रश्न मोडून काढण्यासाठी सावरकरांनी दलित वस्त्यांमध्ये सहभोजनाचा कार्यक्रम हाती घेतला आणि प्रभावी भाषणांमधून त्यांनी समाजातील विषमता अनिष्ठ चालीरितींवर प्रबोधन केले.सन 1937 मध्ये हिंदु महासभेच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्यवीर सावरकरांची निवड करण्यात आली. सन 1943 पर्यंत त्यांनी हिंदु महासभेचे नेतृत्व सांभाळले. देशाची फाळणी, पाकिस्तानला दिली जाणारी मदत यांसारख्या अनेक मुद्यांवर गांधीजींसोबत सावरकरांचे मतभेद होते.

‘म्हणून’ मी बीडला आले नाही, खासदार प्रीतम मुंडे यांची सारवासारव

सावरकरांनी आयुष्यभर देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मुक्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. परंतु 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मात्र त्यांना जवाहरलाल नेहरु आणि काँग्रेसकडून सदैव दुर ठेवण्यात आले. तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांकडून क्षमता असून सु़द्धा सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या थोर क्रांतीकारकांना नेहमी डावलण्यात आले.

एकदा पुण्यात एका कार्यक्रमात स्व.सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी सावरकरांसमोर त्यांच्या सागरा प्राण तळमळता या पंक्ती गाऊन दाखवल्या. त्यानंतर सावरकरांच्या आग्रहावरून त्यांनी गीत रामायण ऐकवण्यास सुरूवात केली. तेंव्हा खालील दोन पक्तीनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे डोळे पाणावले.

“नको अश्रू ढाळू आता, पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास, अयोध्येत होतो राजा, रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा”

काय भावना दाटुन आल्या असतील तेंव्हा त्यांच्या मनात…?
ज्या सावरकरांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहुन घेतले, त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र सतत अवहेलना सोसावी लागली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी हा महान क्रांतींसुर्य अस्तास गेला. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे होऊन देखील हा स्वातंत्र्यवीर दुर्लक्षीतच आहे.

आता वेळ आली आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपले आदर्श मानणार्या देशाच्या पंतप्रधानांनी पुढाकार घेण्याची, “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च सन्मान स्वातंत्र्यवीर सावरकरांना अर्पण करून त्यांनी केलेल्या त्यागाला गौरवण्याची… आता वेळ आली आहे.

#व्यक्तीविशेष : शंभर आमदारांच्या तोडीचा एकच भिडू.. नाव नामदार बच्चूभाऊ कडू