‘वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील’

sharad pawar ajit and supriya

कराड : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

कोरोना काळातील टाळेबंदीनंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यानं सर्वांचं लक्ष्य या निवडणुकांकडे लागलं असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील वेग घेऊन लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून पक्षांनी बैठकांचं सत्र सुरु केलं आहे. अनेक बडे नेते यामुळे राज्य पालथं घालताना दिसत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना छोटे नेते म्हणून संबोधल्यानंतर राष्ट्रवादी देखील आक्रमक झालेली पाहायला मिळालं. काल, कराडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर निशाण साधतानाच अजित पवार व सुप्रिया सुळे यांना देखील लक्ष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील’ असं विधान पाटलांनी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

कालच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला वर्षपूर्ती झाली. त्यावेळी अजित पवारांनी केलेलं बंड शरद पवारांनी शमवलं. पण, चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य नक्कीच काहीतरी सूचित करून जाणारं आहे यात शंका नाही.यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही गोडवे गायले तरीही गेल्या वर्षी 3 दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडलं होतं आणि हा आता इतिहास आहे.”

महत्वाच्या बातम्या