…जेव्हा राजकीय धुरंधर शरद पवार बंद खोलीत अडकतात

sharad-pawar

सातारा: भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणारे शरद पवार हे चक्क सभागृहात अडकून पडल्याचा प्रकार घडला. शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सकाळी ११ च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली.

रयत शिक्षण संस्थेच्या पत्रकार परिषदेसाठी शरद पवार साताऱ्यात आले असताना सभागृहात अडकून पडल्याचा प्रकार घडला. सभागृहाचा दरवाजा उघडत नसल्यानं पवार पत्रकारांसह १० मिनिटं अडकले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. दरवाजा उघडण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर १० मिनिटांनी दरवाजा उघडला आणि पवार सभागृहाबाहेर पडले.

पत्रकार परिषद सुरु असताना काही पत्रकार आत येण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा दरवाजा लॉक झाल्याचं लक्षात आलं. शरद पवारांचे कार्यकर्ते, पत्रकार, कर्मचारी, आमदार, पदाधिकारी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. दहा मिनिटांच्या काळात पवारांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव नव्हते. ते सगळ्यांना शांत राहण्यास सांगत होते. तसंच त्यांनी मिश्लिकपणे ही घटना हाताळली.