विसर्जन जवळ आले तरी मंडपांची तपासणी सुरूच

solapur ganpati

सोलापूर : तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे झोन ते असून, यामध्ये शहराचा मुख्य भाग येतो. मात्र त्यांच्या पथकाकडून फक्त सहा मंडपांचीच तपासणी झाली आहे. याबाबत सनियंत्रण पथकांचे प्रमुख शिवाजी जगताप यांनी पुन्हा शहरातील मंंडपाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारपासून तपासणी करण्यात येणार आहे.

विसर्जनाची तारीख जवळ येऊन ठेपली तरीही वेळकाढूपणा करत कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणारी मंडपांची तपासणी करण्यात येत आहे.

Loading...

सनियंत्रण पथकांनी नियुक्त केलेल्या पथकांकडून २१ ते २४ ऑगस्ट या कालावधीत १२३ मंडपांची तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल महापालिकेस सादर केला. अहवालाचे स्वरूप पाहता तपासणीची केवळ औपचारिकता पूर्ण केल्याचे दिसते. अहवालामध्ये मंडप ३० टक्के, ४० टक्के, ५० टक्के रस्त्यावर अाहेत. यावरून एकही मंडप सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरत नाही, असे म्हटले आहे. २१ ते २४ ऑगस्ट कालावधीत तहसीलदार विनोद रणवरे यांनी सहा, तहसीलदार अमोल कदम यांनी ९० तर तहसीलदार कोळेकर यांनी २७ मंडपांची तपासणी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील