काँग्रेसच सरकार असतांना गद्दार अमर्त्य सेन यांना ‘भारतरत्न’: सुब्रमण्यम स्वामी

subramanian swamy

टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेसच्या दबावामुळेच गद्दार अमर्त्य सेन यांना ‘भारतरत्न’ मिळाला. असे बोलत भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. नेहमी वादग्रस्त विधान करण्यात आघाडीवर असणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना गद्दार म्हणून संबोधले. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमर्त्य सेन यांना काँग्रेसच्या काळात देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावर बोट ठेवले.

भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काही व्यक्तींचा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी विरोध करत संघाचा प्रचार करणाऱ्यांना मोदी सरकारने पद्म पुरस्कार बहाल केल्याची टीका केली होती.

त्या टीकेला उत्तर देतांना सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर टीकात्मक हल्लाबोल केला. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे कार्यकर्ते हेदेखील भारताचे नागरिक आहेत. त्यांनी देशकार्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली मात्र, त्यांच्या कामगिरीचे योग्यप्रकारे कौतुक झाले नव्हते. यूपीए काळात तर अर्मत्य सेन यांच्यासारख्या गद्दाराला पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी नालंदा विद्यापीठाची लूट करण्याशिवाय देशासाठी काय केले आहे? ते केवळ डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना भारतरत्न देण्यासाठी सरकारवर दबाव टाकला, असे स्वामी यांनी स्पष्ट केले.Loading…
Loading...