मुख्यमंत्री चमच्याने दुध पित होते तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली- तटकरे

पुणे: हल्लाबोल यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांवर चांगलेच बरसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तटकरेंनी मुख्यमंत्र्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

तटकरे म्हणाले, भाजपच्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी फक्त पवार साहेबांवर टीका करण्यात धन्यता मानली. सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री महोदय, जर सूर्यावर थुंकाल तर तुमचीच जीभ जळेल. तुम्ही चमच्याने दुध पित होतात तेव्हा पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.