‘महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर… मनसेकडून केतकी चितळेला इशारा

MNS

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कॉमेडियनने अग्रीमा जशुआ हिने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चौफेर टीका झाली. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली होती. या दरम्यान, मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने जोशुआची अक्कल ठीकाण्यावर आणण्याऱ्या मावळ्यांचीच अक्कल काढली आहे. आता यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केतकी चितळेवर निशाणा साधला आहे.

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट : 
“केतकी यावेळी तू चुकलीस. मागे तुला ट्रोल केले म्हणून आम्ही महिलेला असे ट्रोल करू नये, असं नेटकऱ्यांना सुनावले होते. नावडती केतकी दरवेळेला वादग्रस्त विधान करून लोकांना त्रास देण्याचा काम करते आहे. माझं तुला मनसे सांगणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि करोडो मावळ्यांचे मनावर ते राज्य करत आहे. त्यामुळे कितीही शिकलेले असू द्या, आपली सद्सद्द्विवेक बुद्धी जागी ठेवली नाही तर त्या उच्च शिकण्याचा काहीच उपयोग नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत लोक संवेदशील असतात. त्यामुळे अशा दैवता बद्दल, महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळलेच पाहिजे, अन्यथा कितीही उच्च शिक्षित मावळे असले तरी ते महाराजांबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला त्याची लायकी दाखवल्याशिवाय शंभर फटके हाणून एक मोजल्या शिवाय राहत नाही. याची दखल उच्च शिक्षण शिकूनही बुद्धी नसलेल्या लोकांनी घ्यावी, हा मनसेचा शेवटचा इशारा आहे.
जय महाराष्ट्र ,जय मनसे

दरम्यान, मराठी अभिनेत्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा’ ! अशी संतापजनक फेसबुक पोस्ट केतकी चितळे हिने केली आहे. त्यामुळे पुन्हा आता मनसेने कानउघडणी केली आहे.

पुणे विद्यापीठात यंदापासून पदव्युत्तर शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम

बाई जरा दमाने घ्या ! अमृता फडणवीसांच्या टीकेवर मनसेच्या रणरागिणी संतापल्या

सडक्या मेंदूच्या निर्लज्ज जोशुआचा तिव्र निषेध, भाजप नेता भडकला