‘जेव्हा सिंबा माझ्या गल्लीत येतो….’ ; अभिनेता रणवीर सिंग अजिंक्य रहाणेच्या भेटीला

सिंबा

मुंबई : आयपीएलच्या 14 पर्वाला आज पासून सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आजचा पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आज साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन या सामन्याला सुरुवात होईल.

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगची क्रिकेटच्या मैदानावर एन्ट्री झाली आहे. सिंगने मुंबईच्या क्रिकेट मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणेची भेट घेतली. रणवीरने रहाणेसोबत एक फोटो शेअर करत म्हटलं की. ‘टूर्नामेंटसाठी ऑल दी बेस्ट चॅम्पियन’ अशी पोस्ट इंस्टाग्रामवर केली आहे.

या दरम्यान अजिंक्य रहाणे आणि रणवीर सिंग यानी क्रिकेटचा ही आनंद घेतला. रहाणे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करता लिहिले की, ‘जेव्हा सिंबा माझ्या गल्लीत येतो तेव्हा एक क्रिकेटचा शॉट तर झालाच पाहिजे.’

रणवीर सिंग आपल्या आगामी 83 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिकेट मैदानात पोहोचला. या चित्रपटात रणवीरने मुख्य भूमिका साकारली आहे. 83 हा सिनेमा १० एप्रिल २०२०ला प्रक्षेकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात होत. मात्र आता हा चित्रपट  4 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.सिनेमात रणवीर सिंग हा कपिल देवच्या मुख्य भूमिकेत आहे. तर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पदुकोण करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :