जेंव्हा शरद पवार आणि युवराज संभाजीराजे भोसले ‘दिल्ली ते मुंबई’ सोबत प्रवास करतात

sambhajiraje with shrad pawar

राजकारणातील दिग्गज, चाणक्य म्हणून एक वेगळी ओळख असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक जणांना राजकारणाचे डोस पाजलेत. आजच्या राजकीय घडीला कोकणापासून-विदर्भापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून-पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, खेड्यातील पारापासून-मुंबईतील मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळापर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेले राजकीय नेतृत्व म्हणजे शरद पवार. शरद पवारांसोबत राजकीय चर्चा म्हटलं कि अनेक राजकीय नेत्यांना उत्सुकता असते. असाच अनुभव युवराज संभाजीराजे भोसले यांना आला. दिल्लीहून मुंबईला येताना संभाजीराजेना शरद पवारांसोबत प्रवास करण्याचा योग आला.

Loading...

युवराज संभाजीराजे भोसले यांनी प्रवासादरम्यान राजकीय चर्चा झाल्याचे त्यांच्या फेसबुक पोस्ट लिहलं आहे. युवराज संभाजीराजे म्हणाले, ”आज दिल्लीहून मुंबईला येताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबत प्रवास करण्याचा योग आला. साहेबांनी या प्रवासादरम्यान मनमोकळेपणाने चर्चा केली. रायगड किल्ल्यावर करण्यात येणाऱ्या कामांची त्यांनी माहिती घेतली. विषेशतः राजधानी दिल्ली येथे साजरी करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्ताने त्यांनी केलेले कौतुक यापुढेही काम करण्यास निश्चित प्रेरणादायी ठरेल.”

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकी काय चर्चा झाली हे जरी युवराज संभाजीराजे यांनी पूर्णपणे स्पष्ट केलं नसलं. तरी विरोधकांच्या भाजपला मात देण्यासाठी बैठकीवर बैठकी सुरु आहे. सध्याचं बदललेलं राजकारण, भाजपची पुढील रणनीती याबात चर्चा चांगलीच रंगल्याचे बोलले जात आहे. युवराज संभाजीराजे यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर व्यक्त होतांना ”एक राजघराण्यातील वारस ‘ राजा ‘ दुसरा ‘ जाणता राजा ‘ जनता (रयत) दोघावरतीही प्रेम करते.” अशा प्रकारे प्रतिसाद दिला आहे.Loading…


Loading…

Loading...