रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं-संजय राऊत

chandrakant patil

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या विधानामुळे शिवसेना – भाजपची पुन्हा युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कलगीतुरा मुख्यमंत्र्यांचा या वक्तव्यानंतर देखील सुरूच आहे. राऊत हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असा टोला पाटील यांनी काढल्यानंतर कुणाला माहीत नसताना पाटील मंत्री होऊ शकतात तर मी का नाही मोठ्या पदावर जाऊ शकत? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना सर्वकाही सुरळीत होतं, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचंही कौतुक केले आहे. तसेच दानवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीला बोलावल्याचंही समर्थन केलं. मुख्यमंत्र्यांनी दानवेंना भेटायला बोलावलं आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत. मी देखील त्यांना अनेकदा भेटतो. ते अजातशत्रू आहेत.

दानवे जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष होते. तेव्हा सर्व काही सुरळीत सुरू होतं, तेही खरं आहे, असं सांगतानाच त्यांना बोलावलं असेल तर चांगलं आहे. ते रेल्वे राज्य मंत्री आहेत, रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत, मुंबईचे,राज्याचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाशी कोणत्याही राज्याचा संवाद राहणं महत्त्वाचं आहे, असे मत यावेळी राऊत यांनी यावेळी मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या