…जेव्हा राज ठाकरे आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवतात

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या झंजावात दौऱ्यात राज ठाकरे यांनी आज पालघर जिल्ह्याचा आढाव घेतला या दरम्यान, पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील वाडा विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या या कार्यकर्त्याच्या घरी त्याच्याबरोबर जमिनीवर बसून जेवण केले. राज यांच्या या कृतीचे सगळ्याच स्थरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात नाशिक मध्ये राज ठाकरे यांनी जमिनीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. आज पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्त्याचा नेता हि राज यांची प्रतिमा समोर आली आहे. नुकतेच ट्विटरवर आलेल्या राज ठाकरे यांनी ट्विट करून यासबंधी माहिती दिली आहे.

 

You might also like
Comments
Loading...