जेव्हा प्रियांका राजकारणात येईल तेव्हा लोक मला विसरतील , इदिराजींनी केलं होत भाकीत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या कधी दिवसांवर येऊन ठेपल्या असताना कॉंग्रेसने आपली ‘हुकुमाची राणी’ अर्थात प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवून मोठी खेळी खेळली आहे. कॉंग्रेस पक्षाने त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले आहे.  त्यांच्याकडे पुर्व उत्तरप्रदेशच्या प्रभारी म्हणूनही काम सोपवण्यात आले आहे.

अशातच आता प्रियांका गांधी यांच्यात लोक इंदिरा गांधी यांची छबी पाहत आहेत. यातच ”एएनआय” या नामांकित वृत्तसंस्थेचा एक व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये कांग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कॉंग्रेसचे चाणक्य समजले जाणारे माखनलाल फोतेदार यांनी स्वर्गीय इंदिरा गांधींनी प्रियांका यांच्याबाबत केलेल्या भविष्यवाणी विषयीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

कांग्रेसचे वरिष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांनी पूर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केलेल्या एका भविष्यवाणीबाबत सांगितले आहे. फोतेदार सांगतात इंदिराजींनी एकदा, ”माझ्या घरी एक मुलगी आहे, तिचे नाव प्रियांका आहे. तिचे भविष्य फार चांगले आहे. जेव्हा ती मोठी होऊन राजकारणात येईल तेव्हा लोक मला विसरतील, आणि प्रियंकाला स्वीकारतील. आता हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=_p_F9pwxoNw