राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता का शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा पुळका येतो ?- बच्चू कडू

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा मोठा पुळका येत आहे. याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाचे कृषीमंत्रीपद भूषविले आहे, तसेच त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेतही वाटेकरी होता. तेव्हा शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेत्यांनी शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याची हिंमत का दाखविली नाही, आताच त्यांना शेतकºयांचा एवढा पुळका कशासाठी येत आहे, अशी बोचरी टीका प्रहार चे नेते आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी येथे केला.
येथील पोलिस मुख्यालय परिसरात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या शेतकºयांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी शेतकºयांना संबोधित करताना चौफेर टीका केली.