पवार कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या- भाजपा

सोलापूर :आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शरद पवार भाजपाला जबाबदार ठरवत आहेत मात्र शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांच्याच काळात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या असा आरोप मात्र भाजपाचे प्रवक्ते तथा सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी गणेश हाके यांनी केला आहे. ते बोलतात तसे कधीच वागत नाहीत़ प्रत्येकवेळी त्यांनी भूमिका बदलली आहे़ उलट भाजपाने शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना राबविल्याचे देखील त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस असून, यानिमित्त त्या दिवशी मुंबईत वांद्रे (पूर्व) बीकेसी ग्राउंडवर महामेळावा आयोजित करण्यात आला आहे़ हा मेळावा यशस्वी करण्यासाठी हाके हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते़ यावेळी श्रमिक पत्रकार संघात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य करत वरील आरोप केला़ .

काय म्हणाले गणेश हाके ?
आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शरद पवार भाजपाला जबाबदार ठरवत आहेत मात्र शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांच्याच काळात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर भाजपाने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शाश्वत शेतीसारख्या उपाययोजना राबविल्या. ते बोलतात तसे कधीच वागत नाहीत़ प्रत्येकवेळी त्यांनी भूमिका बदलली आहे़ .

You might also like
Comments
Loading...