fbpx

मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा मी दिल्लीत जायला तयार- मुख्यमंत्री

Devendra fadnvis pune

टीम महाराष्ट्र देशा:-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.याचं पार्श्वभूमीवर मुखमंत्री देवेंद फडणवीस यांनी मुंबई येथे एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखती मध्ये मुखमंत्री फडणवीस म्हणाले की , मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जायला तयार आहे असे व्यक्तव्य त्यांनी केले आहे.

मुखमंत्री पुढे म्हणाले , आमची परीक्षक जनता आहे. महाजनादेशाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु याचा लोकांना विश्वास वाटतो. आमच्या यात्रेनंतर इतर पक्षांनी यात्रा काढावी वाटली. विरोधकांच्या यात्रांना आमच्या यात्रेसारखा प्रतिसाद नाही. सोबतच त्यांनी उदयनराजे राजे भोसले यांच्या बदल सूचक असे व्यक्तव्य करत ते म्हणाले उदयनराजे पक्षात आले तर आनंद, आम्ही त्यांचे स्वागत करु असे ते म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रा तर भाजपकडून महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे.