जेव्हा पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे एकमेकांसमोर येतात…

blank

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात सगळीकडेच लोकसभेचं वारं वाहत आहे. उमेदवार अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्यातच आज मावळ लोकसभा मतदारसंघात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं.

मावळमध्ये पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही नेत्यांचे हजारो समर्थक हजर होते. अर्ज भरतेवेळी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांसमोर आले होते. दोघांनीही खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करून हस्तांदोलन करत एकमेकांना सदिच्छा दिल्या. त्यामुळे पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या भेटीची मावळ लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मावळमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे अशी तगडी लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांच्यासमोर पार्थ पवार यांचे मोठे आवाहन असणार आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार असलेले श्रीरंग बारणे आणि मोठा राजकीय वारसा असलेले पार्थ पवार यांच्यात होणारी लढत ही राज्यातील सगळ्यात चुरशीची असणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपूर्ण ताकद या मतदारसंघासाठी लावली आहे.