जेंव्हा पंकजा मुंडे भावाचे आभार मानतात

pankaja munde and dhananjay munde

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर विधान परिषदेत स्तुतीसुमनं उधळली. अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असतांना पंकजा मुंडेनी धनंजय मुंडेंचे आभार मानले.

नेहमी एकमेकांच्या विरोधात राहणाऱ्या भाऊ-बहिणीत आज विधान परिषदेत का होईना पण आपुलकीचं नात पाहायला मिळाल. धनंजय मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झालं आहे. त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे असे स्पष्ट केले. त्यावर . ”कुपोषण वाढलं असल्याचं सांगत नेहमी टीका होते. मात्र कधी नव्हे ते माझ्या खात्याचं या सभागृहात कौतुक केल्याबद्दल आभार मानते,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडेनी सुद्धा ”मन मोठं करुन माझे आभार मानले. तसंच अंगणवाडी सेविकांचं मानधनही १० हजार रुपये करून मन मोठं करावं,” अशी मागणी केली. बहिण भावाच्या चर्चेमुळे सभागृहात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.