fbpx

जेव्हा भरसभेत राष्ट्रवादीचा आमदार करतो पंकजा मुंडेंची स्तुती…

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच सगळेच नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशाच एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी पंकजा मुंडे यांची स्तुती केली आहे. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

राजेश टोपे यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदारसंघात त्यांच्या खात्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. मी आजपर्यंत जे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो, ते कधीच अडले नाही. पंकजा ताई माझ्या भगनी असल्याचे राजेश टोपे म्हणाले. विरोधी पक्षाचा आमदाराने सत्ताधाऱ्यांचे कौतुक करणे ही फार दुर्मिळ बाब आहे.

तसेच पुढे बोलताना टोपे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याशी सुद्धा आपले चांगले संबध होते. मला ज्यावेळी अडचण आली तर ते मार्गदर्शन करायचे. त्याचप्रमाणे पंकजा मुंडे ह्या सुद्धा माझ्या मतदारसंघातील कोणतेही काम थांबवत नसल्याचे सुद्धा टोपे म्हणाले. त्यामुळे राजकारणापलीकडची मैत्री काय असते याचा प्रत्यय उपस्थितांना आला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नव्या उमेदवारांना संधी देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आले आहे.