जेंव्हा स्वच्छतेसाठी ‘नगराध्यक्ष’ गटारात उतरतो

करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे स्वच्छता अभियान

दीपक पाठक: आज काल युवा नेता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा येते ती मोठं मोठे बॅनर , पांढरे शुभ्र वस्त्र , आणि सोन्याने मढलेला एक युवा नेता. अशात जर कोणा तरुण नेत्याने नागरिकांत जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेतले तर नवलच.  या सगळ्या पारंपरिक पुढारीपणाला आणि व्ही.आय पी. कल्चरला फाटा दिलाय ते सोलापूर जिह्ल्यातील करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी .

वय अवघं 27 वर्ष. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या एकमेव नगरपालिकेचे वैभवराजे नगराध्यक्ष आहेत . पावसाळ्याच्या दिवसात करमाळा शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो . शहरातील गटारी तुंबल्यामुळे शहरभर पाणी साचत असायच. यामुळे रहदारीचा आणि त्याहीपेक्षा नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असे . लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या या प्रश्नावर वैभवराजे जगताप यांनी लक्ष केंद्रित करून जवळपास सव्वा वर्षापासून काम करायला सुरुवात केली.vaibhavraje jagtap nagaradhyaksh karmalaशहरात जवळपास 6 फूट खोली असलेल्या या गटारी अक्षरश बुजून गेल्या होत्या. हे स्वच्छ करण्याकरता वैभवराजे यांनी स्वतः हातात फावडे घेऊन गटारीत उतरून दिवस दिवस काम करत या गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरु केले. सोबतच नगरपालिकेमध्ये काम करणारे जे स्वछता कामगार नेमण्यात आले होते त्यांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना आरोग्यसुविधा, आहार,काम करताना लागणारे कपडे आदी सर्व सुविधा देण्यात आल्या.vaibhavraje jagtap nagaradhyaksh karmalaराजकीय विरोधक या कामावर टीका करताना हा पब्लिसिटीस्टंट असल्याचा आरोप करतात मात्र जनसेवेच्या उद्देशाने मी हे काम करत असून विरोधकांना हे काम करण्यापासून कोणी रोखले होते. असा सवाल जगताप यांनी केला आहे. तसेच अशा टिकेकडे आपण लक्ष देत नसून जनतेसाठी जे जे करता येईल ते करत राहणार असल्याचे देखील स्पष्ट केलं आहे.vaibhavraje jagtap nagaradhyaksh karmalaजनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा असा नेता पाहण्याची संधी तशी क्वचितच मिळते ,पण युवा नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे स्वतः पुढाकार घेऊन ज्यापद्धतीने शहर स्वच्छतेच्या प्रश्नावर काम करत आहेत त्यामुळे जगताप याचं संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे.
vaibhavraje jagtap nagaradhyaksh karmala

 

You might also like
Comments
Loading...