‘मोदींनी ट्विट करताच लोकांनी बँकासमोर रांगा लावल्या’

मोदींच्या भाषणानंतर देशाने मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे. महत्त्वाची घोषणा करणार असं मोदींनी ट्विट करताच जनतेनं दोन हजाराच्या नोटा तर मोदी बंद करणार नाहीत ना? या भीतीने बँकांसमोर रांगा लावल्या,” असं ‘आप’चे नेते संजय सिंग म्हणाले. ‘मिशन शक्ती’बाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात देशाला महत्त्वपूर्ण संदेश देणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली होती.  महत्त्वाचं म्हणजे भाजप नेत्यांचे फोन बंद करण्यात आले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मुद्द्यावर बोलणार, याचे तर्क लढवण्यासही सुरुवातही झाली होती.

Loading...

मोदींनी केलेल्या भाषणात ‘मिशन शक्ती’ अवघ्या ३ मिनिटात पूर्ण केल्याची सर्वात मोठी घोषणा केली. भारताने ३०० किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ भारताने पूर्ण केलं.

अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे. ‘मिशन शक्ती हे अत्यंत अवघड होतं, वैज्ञानिकांनी लक्ष्य भेदलं, आम्हा सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे, मिशन शक्तीशी जोडलेल्या सर्व वैज्ञानिकांना सलाम’ अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं.

 


Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील