मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा या काही बोलत नाही आणि काही करत पण नाही;निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत पण नाही आणि काही करत पण नाही; पण कोण समाजाला मदत करतो तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं,अशी ट्वीटर च्या माध्यमातून भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल पुण्यात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंदचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आवाहन केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत भाजपावर निशाणा साधला होता.

Loading...

सुळे पुढे म्हणाल्या होत्या की,सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचे मला वाटते. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचे आहे, तसेच, सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल काही सल्ला देणार का? असा सवाल उपस्थित पत्रकारांनी केला असता . यावेळी माझ्याकडे कोणी सल्ला मागितल्याशिवाय मी कोणालाही सल्ला देत नाही, असे सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या होत्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण