‘सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद ??’: चित्रा वाघ

CHITRA वाघ

पुणे: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबवेवाडी परिसरात तीन तरुणांनी कोयत्याने वार केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स याठिकाणी ही घटना घडली. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार केला. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपली प्रतिकिया दिली आहे. ‘अतिशय भयानक काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर पोलिस कायदे कागदावर महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्र बंद ??,’ असे म्हणत सरकारला चित्रा वाघ यांनी सवाल केला आहे.

११ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने याला कडाडून टीका केली. त्यानंतर आता पुण्यासारख्या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडल्याने चित्रा वाघ यांनी आता महाराष्ट्र बंद कधी करणार? असा प्रश्न करत सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या